Ladki Bahin Yojana : ‘ही’ चूक आताच टाळा…नाहीतर 4500 हातातून गमावून बसाल

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना आपल्या बँकेचे तपशील मागितले जातात. हे तपशील भरताना आपण थेट चालू बँक खाते अर्जात भरून घेतो.

हे बँक खाते भरत असतान आपण आपलं कोणतं बँक खातं आधारशी लिंक आहे, याची चाचपणी देखील करत नाही. इथेच आपल्याकडून मोठी चूक घडते आणि आपल्याला लाडक्या बहिणींच्या निधीपासून वंचित राहावे लागते.

काही प्रकरणात तर असं झालंय की महिलांनी भरलंय एक अकाऊंट आणि दुसऱ्याच अकाऊंटमध्ये पैसे जमा झाले आहे. या मागचे कारण म्हणजे महिलेने जे अकाऊंट अर्जात भरले होते ते अकाऊंट आधारशी लिंक नव्हते.

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तर महिलेचे दुसरेच अकाऊंट हे आधारशी लिंक नव्हते. त्यामुळे महिलांनी अर्ज भरताना किंवा अर्ज भरल्यानंतर देखील आधारकार्ड बँकेशी जोडून घेता येणार आहे. त्यामुळे महिलांनी अर्ज भरताना या गोष्टीची काळजी घ्यायची आहे.

विशेष म्हणजे तुम्हाला या गोष्टीसाठी बँकेत जायचीही गरज नाही. ऑनलाईनही आधारच्या वेबसाईटवर बँक आधारशी लिंक करता येते. या संबंधित अनेक बातम्या मुंबई तके आधी केल्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला सोप्प्या पद्धतील आधार बँकेशी लिंक करता येणार आहे. त्यामुळे आताच तुमची ही चूक सूधारून घ्या.

‘इतक्या’ महिलांनी घेतला योजनेचा लाभ

”मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी 40 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी 7 लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे.

तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरीत केला”, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.

‘सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अर्जांची छाननी सुरु आहे. ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की, दोन कोटी पेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील. आमचा प्रयत्न आहे की, अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा”, असंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇इतर महत्वाची माहिती👇👇

👉Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! तिसऱ्या हफ्त्याचे पैसे मिळणार, पण कधी अन् किती वाजता?

👉ZP Yojana 2024 : जिल्हा परिषद मार्फत शिलाई मशीन, सायकल व ताडपत्रीचे वाटप सुरु; असा करा अर्ज

👉Free education for girls : या वर्षी पासूनच मुलींना मोफत शिक्षण दिले जाणार; शासन निर्णय जाहीर

2 thoughts on “Ladki Bahin Yojana : ‘ही’ चूक आताच टाळा…नाहीतर 4500 हातातून गमावून बसाल”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा