Ladki Bahin Yojana 2024 : लाडकी बहीण योजनेत आज झाले मोठे बदल; पहा सविस्तर माहिती

Mazi Ladki Bahin Yojana 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक जुलैपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली असून 15 जुलै ही अंतिम तारीख दिलेली आहे, 16 जुलै रोजी तात्पुरती यादीचे प्रकाशन केलं जाईल आणि तात्पुरती यादी व तक्रार हरकती दाखल करता येणार होतो परंतु आता यासाठी कोणतीच मुदत लागू केलेली नाही.

एक ऑगस्टला अंतिम यादी प्रकाशित करून 15 ऑगस्ट रोजी योजनेचा पहिला हप्ता 1500 रुपयांचा लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल, दर महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत या योजनेचा लाभ महिलांचे बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे.

सध्याच्या सरकारच्या वतीने महिलांच्या उत्थानासाठी विविध योजना आखल्या जात आहेत शासनाने यात जास्त अटी ठेवू नयेत जेणेकरून अडचणी येणार नाहीत अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.

कोणाला मिळेल लाभ?

  • लाभार्थी ही महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • वयाची कमीत कमी 21 वर्षे आणि जास्तीत जास्त साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत संबंधित महिलेला या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • संबंधित महिलेचे बँक खाते असणे बंधनकारक आहे.
  • तसेच लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.

ही कागदपत्रे आवश्यक

महिलांना ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे यासाठी उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, लाभार्थ्याच्या आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, बँक खाते पासबुकची झेरॉक्स, तसेच अटी व शर्तीचे पालन करण्याबाबतचा हमीपत्र सोबत जोडावे लागणार आहे.

अर्ज भरण्याची प्रक्रिया (Mazi Ladki Bahin Yojana 2024)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज पोर्टल तसेच मोबाईल ॲप द्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात पात्र महिला यासाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल.

त्याच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे असणार आहेत.

भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालय, सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन भरला जाईल. अर्ज भरण्याची प्रक्रिया विनामूल्य राहील त्यामुळे कोणालाही पैसे देण्याची गरज पडणार नाही.

या महिलांना लाभ मिळणार नाही

  • ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे Mazi Ladki Bahin Yojana 2024 अशा कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • कुटुंबातील सदस्य संयुक्तरीत्या पाच एकरापेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • चारचाकी (ट्रॅक्टर वगळता) नावावर असल्यास तसेच शासकीय सेवेत नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी किंवा मंडळ उपक्रमाधित्व केंद्र तसेच राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना सुद्धा लाभ मिळणार नाही.

PDF अर्ज डाउनलोड करा

हे हि वाचा…

एसटी महामंडळाची नवीन योजना !! फक्त 1100 रुपये भरा आणि महाराष्ट्रात कोठेही फिरा | MSRTC Avdel tithe pravas yojana

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा