Maharashtra Sarkari Yojana : जिल्हा परिषद योजनेअंतर्गत विविध योजना दरवर्षी राबवल्या जातात यावर्षी सुद्धा जिल्हा परिषदे अंतर्गत लॅपटॉप, झेरॉक्स मशीन, कडबा कुट्टी मशीन, पिको फॉल मशीन, मिरची कांडप यंत्र व इतर सुविधा दिल्या जाणार आहेत.
यासोबतच विनाअट घरकुल योजना त्यानंतर स्कूटर सुद्धा मिळणार आहे या योजनेची अंतिम तारीख 15 जुलै 2024 असून यासाठी तुम्हाला 15 जुलै चा आत अर्ज सादर करायचे आहेत, हे अर्ज तुम्हाला खाली दिलेल्या पद्धतीने सादर करणे आवश्यक असेल.
योजनांचा तपशील
- मागासवर्गीय संगणक लॅपटॉप पुरविणे – 42000 रुपये
- मागासवर्गीय झेरॉक्स मशीन पुरविणे – 43070 रुपये
- मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन पुरविणे – 43070 रुपये
- मागासवर्गीयांना कडबा कुट्टी यंत्र पुरविणे – 29000 रुपये
- मागासवर्गीय महिलांना पिको फॉल मशीन पुरविणे – 9300 रुपये
- मागासवर्गीयांना दुग्ध व्यवसायासाठी गाय म्हैस पुरवठा करणे – 40000 रुपये
- मागासवर्गीयांना मिरची कांडप यंत्र पुरविणे – 20000 रुपये
- मागासवर्गीय शेळीपालनासाठी शेळीचे गट पुरविणे – 25000 रुपये
तसेच जिल्हा परिषद पाच टक्के उपअनुग्रहातील दिव्यांगासाठी योजना Zilla Parishad Yojana 2024 अंतर्गत
- दिव्यांग व्यक्तींना विनाअट घरकुल देण्याची योजना – 120000 रुपये
- निराधार निराश्रीता अति तीव्र दिव्यांग व्यक्तींना विनाअट निर्वाह भत्ता – 10000 रुपये
- अस्थिव्यांग व्यक्तींना स्वयंचलित तीन चाकी सायकल स्कूटर विथ अडॉप्शन डिव्हाइसेस – 100000 रुपये एवढे देण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाच्या किमान 20% रक्कम या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व नवबौद्ध आणि पाच टक्के दिव्यांगासाठी खर्च करणे आवश्यक असते.
त्यानंतर जिल्हा परिषद जिल्हा समाज कल्याण अधिकारी छत्रपती संभाजीनगर अंतर्गत हे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
सर्वसाधारण अटी व शर्ती (Maharashtra Sarkari Yojana)
- अर्जदार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व नवबौद्ध या घटकातील असावा.
- संगणक योजनेचा अर्जदार बारावी उत्तीर्ण व एमएससीआयटी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र धारक असावा.
- पिको फॉल शिलाई मशीन या योजने करिता महिला शिवण काम करत असल्याचे ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र असावे.
- प्रत्येक योजने करता उत्पन्न प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र तहसील कार्यालयाचा असावे.
- ज्या योजने करिता विद्युत पुरवठा आवश्यक आहे त्याकरिता विद्युत पुरवठा असल्याचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र असावे.
- 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग तो असल्याबाबतची UDID प्रमाणपत्र.
- तहसीलदार यांनी दिलेल्या अधिवस/रहिवासी प्रमाणपत्र.
- यापूर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र.
- आधार कार्ड चे झेरॉक्स.
- घरकुलासाठी आठ चा उतारा.
- अर्जदारा ग्रामीण भागातील रहिवाशा असावा.
- तहसीलदार यांनी दिलेले वार्षिक उत्पन्नाचा दाखला.
- स्कूटर विथ अडॉप्शन चालवण्याकरिता लाभार्थी कडे परिवहन अधिकारी यांचा परवाना प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
अर्ज कसा करावा (Maharashtra Sarkari Yojana 2024)
या योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर या सर्व वस्तू तुम्हाला मिळणार आहेत यासाठी पात्र उमेदवाराने 15 जुलै 2024 या अंतिम तारखेच्या पंचायत समिती कार्यालयाचे सादर करावे.
आपापल्या ठिकाणच्या पंचायत समिती कार्यालयांमध्ये हे परिपत्रक दाखवून तुम्ही अर्ज सादर करू शकता तुम्ही सुद्धा पात्र असाल तर परिपत्रक डाऊनलोड करून लवकरात लवकर अर्ज सादर करा.
झेरॉक्स मशीन