ZP Yojana 2024 : महाराष्ट्रामधील जिल्हा परिषद अंतर्गत विविध योजना राबवण्यात येतात या योजनेचा लाभ सर्व सामान्य लाभार्थ्यांना मिळत असतो दरवर्षीप्रमाणे याही वर्ष भरपूर जिल्हा परिषदेमध्ये योजना चालू झाल्या असून महानगरपालिकेमध्ये सुद्धा योजना चालू झालेल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या 2024-25 (ZP Schemes 2024) यावर्ष करिता 20% व 5% जिल्हा परिषद सेस फंड योजना अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत तरी इच्छुक नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे कळविण्यात येत आहे.
योजनेचा तपशील (ZP Yojana 2024)
- मागासवर्गीय महिलांना शिलाई मशीन
- मागासवर्गीय शेतकऱ्यांना ताडपत्री
- मागासवर्गीय मासेमारी व्यावसायिकांना नायलॉन जाळी
- मागासवर्गीय 5 वी ते 11 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींना दोन चाकी सायकल
- पाच टक्के दिव्यांगाना लघुउद्योगासाठी अर्थसहाय योजना.
अर्जाचा कालावधी व अर्ज कुठे करावा
या योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांपासून, विद्यार्थ्यांना व दिव्यांगांना सुद्धा लाभ देण्यात येत आहेत यासाठी इच्छुक लाभार्थ्याकडून पंचायत समिती कार्यालयामार्फत अर्ज मागविण्यात येत आहे ते अर्ज 31.07.2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
पंचायत समिती स्तरावर जिल्हा परिषद सेस फंड योजनेअंतर्गत ही योजना राबविण्यात येत आहे सर्व ग्रामपंचायतीकडून अर्ज मागवून ते अर्ज पंचायत समितीकडे सादर करावे लागणार आहेत.
आवश्यक कागदपत्रे (ZP Yojana 2024)
१)अर्जदार यांचा ग्रामपंचायत रहिवासी दाखला.
२) लेडीज सायकल योजने व्यतिरिक्त इतर योजनांकरिता शाळा सोडण्याचा दाखला.
3) सक्षम प्राधिका-याने निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र
४)अर्जदाराचे रु.50,000/- पर्यंत वार्षिक उत्पन्न असल्याचे सक्षम प्राधिका-याने निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला.
५) ७/१२ व ८ अ उतारे
६) कर भरल्याची पावती
७) विद्युत बिल भरल्याची पावती.
८) आधार कार्ड
९) आधार संलग्नित बँकेचे पासबुक
सदरी योजनेसाठी पंचायत समिती स्तरावरून अर्ज मागवून घेत असून पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज सादर करू शकता.
अर्जाची प्रक्रिया व लागणार कालावधी
१)सदर योजनेंतर्गत जि.प.स्वउत्पन्नाचा 20% निधी अनु.जाती,अनु.जमाती व विजभज प्रवर्गाच्या कल्याणकारी योजनांवर खर्च करण्यात येते.सदर योजना 100% अनुदानित आहे.
२) सदर योजनेंतर्गत पंचायत समिती मार्फत अर्ज कार्यालय ,जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जि.प.वर्धा यांचेकडे स्वीकारण्यात येतात.
३) पात्र/अपात्रतेची यादी तयार करण्यात (ZP Yojana 2024) येते.
४)पात्र लाभार्थ्यांची यादी समाज कल्याण समिती सभेत सादर करण्यात येते.
५) समाज कल्याण समिती द्वारे उद्दिष्टांच्या अनुषंगाने तालुकानिहाय लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.
६) निवड झालेल्या लाभार्थ्यास पत्राद्वारे कळविण्यात येते
७)लाभार्थ्यांची ज्या साहित्यासाठी निवड झालेली आहे त्या साहित्यासाठी मंजूर केलेली रक्कम DBT द्वारे लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँकखात्यात जमा करण्यात येते.
८) साहित्याची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत लाभार्थ्याने साहित्याची खरेदी करून त्यासंबंधीचे देयक पंचायत समितीस सदर करणे बंधनकारक आहे.
९) सदर प्रक्रिया किमान 02 ते 03 महिन्यात पुर्ण होते.
कोण पात्र असेल (ZP Yojana 2024)
जिल्हा परिषदेच्या नियमानुसार ज्यांचे उत्पन्न नियमांमध्ये बसेल असे लाभार्थी तसेच मागासवर्गीय महिला, शेतकरी व पाचवी ते अकरावी पर्यंतचे विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
या योजनेची माहिती खालील प्रसिद्धीपत्रकामध्ये दिलेली आहे खालील लिंक वरून प्रसिद्ध पत्रक डाऊनलोड करून इच्छुक अर्जदाराने लवकरात लवकर अर्ज सादर करावेत 31 जुलै 2024 पर्यंत या योजनेची मुदत असून जेवढ्या लवकर अर्ज सादर करता येतील तेवढ्या लवकर अर्ज सादर करावेत.
प्रसिद्धीपत्रक : डाऊनलोड करा
हे हि वाचा…